१. तेव्हा आपली पूजा बंद केलेली कळल्यावर नंद इ. गोपांवर इंद्र रागावला. कृष्ण या सर्वांचा नेता होता. २. विद्वंसक मेघांच्या संवर्तक नावाच्या गणाला इंद्राने प्रेरणा दिली. स्वतःला सर्वांचा स्वामी समजणारा इंद्र संतापून त्या ढगांना म्हणाला. ३. हे जंगलात राहणारे गोप! यांना संपत्तीचा मोठा गर्व झालाय. मर्त्य कृष्णाच्या नाडी लागून ते...