-
१. आयोदधौम्य नावाचे एक ऋषी होते. त्यांना तीन शिष्य होते उपमन्यु, आरुणि आणि वेद अशी त्यांची नावे होती.
२२. एकदा त्यांनी पांचाल देशातून आलेल्या आरुणिला, "जा आणि शेतातल्या वावराला बांध घालून ये," म्हणून पाठवले.
२३. गुरुजींनी आदेश दिल्यावर तो आरुणि पांचाल्य तिकडे गेला पण वावराला बांध काही घालू शकला नाही. त्याला खूप त्रास झाला. शेवटी त्याला एक उपाय सापडला. 'झालं तर मग असंच करीन' असं तो स्वतःशी म्हणाला.
२४. तो त्या वावरातच शिरला मग तो तिथे अशा प्रकारे पडून राहिल्यावर ते पाणी वाहायचे थांबले.
२५. थोड्यावेळाने आयोदधौम्य गुरुजींनी अचानक शिष्यांना विचारले, "अरे! आरुणि पांचाल्य कुठे गेला रे?"
२६. ते त्यांना म्हणाले, "गुरूजी! तुम्हीच तर त्याला पाठवलं, जा आणि वावराला बांध घाल म्हणून!" असं म्हटल्यावर त्या शिष्यांना ते म्हणाले, "म्हणून मग आपण सगळे तिथे जाऊ तिथे तो आरुणि गेला आहे."
२७. गुरूजी तिकडे गेले आणि त्याला बोलावण्यासाठी हाका मारू लागले, "अरे आरुणि पांचाल्या! कुठे आहेस रे? बाळ! ये!"
२८. ते गुरूजींचे शब्द ऐकून आरुणि त्या वावरातून ताबडतोब उठला आणि आपल्या गुरुजींपुढे हात जोडून उभा राहिला.
२९. आणि तो त्यांना म्हणाला, "हा मी इथे शेतात आहे. वाहून जाणारे आणि कशानेही अडवले जाऊ न शकणारे पाणी अडवण्यासाठी मी इथे आत घुसलो आहे. आपल्या हाका ऐकल्यावर ताबडतोब माझ्या शरीराने घातलेला बांध फोडून उठून आपल्यापुढे उभा राहिलो आहे.
३०. तर मी आपणास अभिवादन करतो. आपण आज्ञा करावी मी आता कोणती गोष्ट साधू?"
३१. असं म्हटल्यावर ते गुरूजी उत्तरादाखल म्हणाले तू वावर फोडून उभा राहिलास म्हणून "उद्दालक" या नावाने तू भविष्यात ओळखला जाशील", असे म्हणून गुरुजींनी त्याला आशीर्वाद दिला.
३२. "आणि तू माझ्या सांगण्याचे पालन केलेस त्यामुळे तुझे कल्याण होईल सर्व वेद, तसेच सर्व धर्मशास्त्रे तुझ्या बुद्धीत उतरतील." गुरूजींनी असे म्हटल्यावर तो इपसित देशी गेला. -
एतस्मिन्नन्तरे कश्चिदृषिर्धोम्यो नामायोदस्तस्य शिष्यास्त्रयो बभूवुरुपमन्युरारुणिर्वेदश्चेति ।। २१ ।।
स एकं शिष्यमारुणिं पाञ्चाल्यं प्रेषयामास गच्छ केदारखण्डं बधानेति ।। २२ ।।
स उपाध्यायेन संदिष्ट आरुणिः पाञ्चाल्यस्तत्र गत्वा तत् केदारखण्डं बद्धे नाशकत् ।
स क्लिश्यमानोऽपश्यदुपायं भवत्वेवं करिष्यामि ।। २३ ।।
स तत्र संविवेश केदारखण्डे शयाने च तथा तस्मिंस्तदुदकं तस्थौ ।। २४ ।।
ततः कदाचिदुपाध्याय आयोदो धौम्यः शिष्यानपृच्छत् क्व आरुणिः पाञ्चाल्यो गत इति ।। २५ ।।
ते तं प्रत्यूचुर्भगवंस्त्वयैव प्रेषितो गच्छ केदारखण्डं बधानेति । स एवमुक्तस्ताञ्छिष्यान् प्रत्युवाच तस्मात् तत्र सर्वे गच्छामो यत्र स गत इति ।। २६ ।।
स तत्र गत्वा तस्याह्वानाय शब्दं चकार । भो आरुणे पाञ्चाल्य क्वासि वत्सैहीति ।। २७ ।।
स तच्छ्रुत्वा आरुणिरुपाध्यायवाक्यं तस्मात् केदारखण्डात् सहसोत्थाय तमुपाध्यायमुपतस्थे ।। २८ ।।
प्रोवाच चैनमयमस्म्यत्र केदारखण्डे निःसरमाणमुदकमवारणीयं संरोद्धुं संविष्टो भगवच्छब्दं श्रुत्वैव सहसा विदार्य केदारखण्डं भवन्तमुपस्थितः ।। २९ ।।
तदभिवादये भगवन्तमाज्ञापयतु भवान् कमर्थं करवाणीति ।। ३० ।।
स एवमुक्त उपाध्यायः प्रत्युवाच यस्माद् भवान् केदारखण्डं विदार्योत्थितस्तस्मादुद्दालक एव नाम्ना भवान् भविष्यतीत्यपाध्यायेनानुगृहीतः ।। ३१ ।।
यस्माच्च त्वया मद्वचनमनुष्ठितं तस्माच्छ्रेयोऽवाप्स्यसि । सर्वे च ते वेदाः प्रतिभास्यन्ति सर्वाणि च धर्मशास्त्राणीति ।। ३२ ।।
स एवमुक्त उपाध्यायेनेष्टं देशं जगाम। अथापरः शिष्यस्तस्यैवायोदस्य धौम्यस्योपमन्युर्नाम ।। ३३ ।।