कृष्ण बाप्पाच्या तोंडात अख्खं जग!

कृष्णाच्या तोंडात अख्खं जग!

श्रीमद्भागवतातील दशमस्कंध पूर्वार्धातील आठवा अध्यायातील ही गोष्ट आहे.

३२. बलराज आणि इतर गोपमुले एकदा खेळत होती. खेळता खेळता त्यांनी आई यशोदेकडे जाऊन सांगितले की कृष्णाने माती खाल्ली.

३३. कृष्णाच्या भल्यासाठीच यशोदा त्याला रागवली आणि घावरून कावऱ्या बावऱ्या झालेल्या कृष्णाचा हात पकडून त्याला म्हणाली,

३४. “अरे, तुला स्वतःला आवरता आलं नाही का? गुपचूप माती का खाल्लीस? हे तुझे सवंगडी, हा तुझा दादा पण हेच सांगत आहेत."

३५. श्रीकृष्ण म्हणाले,
“आई, अगं मी नाही खाल्ली माती. हे सगळे खोटं बोलत आहेत. यांचं तू खरं मानत असशील तर तू स्वतःच माझं तोंड बघ!

३६. “असं आहे तर उघड पाहू तोंड." असं म्हंटल्यावर भगवान हरीने तोंड उघडले. अखंड ऐश्वर्य असलेले श्रीहरी केवळ लीला म्हणून मनुष्यबालक झाले होते

३७. तिला त्यात अखिल विश्व, पर्वत, आकाश,
३८दिशा,द्विपे, समुद्र, पृथ्वी, वायू, अग्नी, चंद्र, तारे युक्त असे आकाशमंडल, आकाशस्थ तेजोमोल, तेज, सूर्य, अंतरिक्ष, वैकारिक इंद्रिये, मन, पंच तन्मात्रा, तीनगुन या सगळ्या विलक्षण गोष्टी, गोकुळ आणि स्वतःला ही आपल्या मुलाच्या उघडलेल्या मुखात पाहून ती गोंधळून गेली.

४०. हे स्वप्न आहे की ईश्वराची माया आहे की माझ्याच बुद्धीला काही भ्रम झालाय? या माझ्या मुलात जन्मजात काही आत्मसिद्धी आहे की काय?

४१. बुद्धी, मन, कर्म आणि वाणी यांद्वारे जसे आहे तसे कधीच अनुमानालाही कळणार नाही. हे सगळं ज्याच्यापासून आहे आणि ज्याच्या आश्रयाने आहे असे समजते, जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे, त्या परमपदाला मी नमस्कार करते.

४२. ही मी आहे, हा माझा पती आहे, हा माझा मुलगा, या व्रजाच्या स्वामीची मी स्वामिनी आहे, ऐश्वर्याची स्वामिनी आहे, पतिव्रता आहे, हे गोप गोपी गोधन हे माझे आहे, असे जे मला वाटत आहे, ती माझी कुबुद्धी आहे. ही ज्याची माया आहे, तोच माझी गती आहे.

४३. यशोदेला अशा प्रकारे या गोष्टीमागचे सत्य कळले. मग त्या परमेश्वराने पुत्र्याच्या स्नेहाच्या रूपात असलेली आपली वैष्णवी माया तिच्या ठायी पसरली.

४४. लगेच यशोदेची त्या घटनेची आठवण गेली. आपल्या लेकराला तिने मांडीवर उचलून घेतले. तिच्या मनात मुलाच्या विषयीचे प्रेम दाटून आले. जसे पूर्वी होते तसेच प्रेम.

४५. वेद, उपनिषदे, भक्तगण या सर्वांकडून ज्याचं माहात्म्य गायलं जातं त्या हरीला ती सामान्य मुलगा समजू लागली.

राजा म्हणाला:
४६. “नंद राजाने इतके मोठे कोणते पुण्य केले होते? आणि थोर यशोदेने तरी कोणते सत्कर्म केले होते जिचं स्तन्य हरीने प्यायले?”

४७. कृष्णाच्या सुंदर बाललीला त्याच्या जन्मदात्यांनाही अनुभवता आल्या नाहीत, त्या बाललीला अजूनही प्रतिभावंत कवी गात असतात. त्रैलोक्याचे पाप दूर करणाऱ्या श्रीशुक म्हणाले.

४८. द्रोण नावाचा एक श्रेष्ठ वसुधारा नावाच्या आपल्या पत्नीसह राहात होता. ब्रह्मदेवाच्या आदेशाचे तो पालन करीत असे.

४९. तो ब्रह्मदेवाला म्हणाला,
“जेव्हा आम्ही पृथ्वीवर जन्म घेऊ तेव्हा जगदीश्वर भगवंतावर आमची दृढ भक्ती जडावी, ज्यायोगे प्राणिमात्र दुर्गती तरून जाईल.

५०. “असेच होवो”, असे म्हंटल्यावर तो श्रेष्ठ व कीर्तिमान द्रोण नंद म्हणून गोकुळात जन्माला आला व नंद म्हणून प्रख्यात झाला.
त्याची पत्नी धरा यशोदा झाली.

५१. हे भरतवंशातल्या राजा, त्यामुळे आपले मूल म्हणून जन्माला आलेल्या भगवान जनार्दनावर तसेच गोप आणि गोपींवर त्या पतिपत्नीची अत्यंत भक्ती होती.

५२. ब्रह्मदेवाचा आदेश सत्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण बालरामासह गोकुळात राहू लागले. त्यांनी आपल्या लीलेने त्यांच्या मनात आपल्या बद्दल प्रेम निर्माण केले.

परमहंस संहिता असणाऱ्या श्री भा म द स्कं पू विश्व नावाचा आठवा अध्याय संपला.

/


Older Post Newer Post


Translation missing: mr.general.search.loading