आमच्याबद्दल

दोन पालकांच्या प्रवासातून स्फुरलेली एक आगळी वेगळी कल्पना, म्हणजे "महती इंटरॅक्टिव्हस"

आपल्या लाडक्या मुलीला पुस्तकांची आवड कशी लावावी, तिला मोबाइल/टीव्ही न दाखवता खेळामध्ये गुंतवून कसे ठेवावे, तिला मातृभाषेची आणि संस्कृतीची ओळख कशी करून द्यावी, या त्यांच्या प्रश्नांचे सापडलेले, हे उत्तर.

तसे पाहता लहान मुलांच्या खेळ आणि पुस्तकांच्या दुनियेत अनेक प्रकार उपलब्ध आहेत, पण त्यात एक गोष्ट हरवून गेली आहे - प्रादेशिक भाषांमधला मजकूर आणि आजूबाजूला सहज सापडतील असे संदर्भ.

हीच पोकळी भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. आमची पुस्तकं आणि खेळ यांचे उद्दिष्ट : -

बालक-पालक संवाद घडवून त्यांच्यातील नातं समृद्ध करणे

बाळाच्या आजूबाजूला सहज सापडणारे संदर्भ आणि मातृभाषेतील मजकूर

भारतीय संस्कृती आणि तिचे द्योतक असणारे वेद, उपनिषद, पुराणं यांची लहान वयात ओळख

संस्थापक



गायत्री पाटसकर आणि शंतनू पाटसकर,
Mahatee Interactives चे संस्थापक आहेत.

गायत्री जवळ जवळ ८ वर्ष बँकिंग आणि वित्त क्षेत्रात काम करीत होती. आई झाल्यानंतर तिने पूर्ण वेळ आपल्या मुलीला द्यायचे ठरवले. आपल्या मुलीसाठी मराठी भाषेतील पुस्तकं आणि खेळणी शोधताना, गायत्री आणि शंतनुला लक्षात आले की, इतक्या छोट्या मुलांसाठी, प्रादेशिक भाषा आणि संदर्भ असलेली खेळणी आणि पुस्तकं बाजारात नाहीत आणि शंतनुला यात व्यवसायाची संधी दिसली.
शंतनुच्या साथीने, गायत्रीने ही संधी साधून, आपल्या या दुसऱ्या अपत्याला जन्म दिला, "महती इंटरॅक्टिव्हस", ज्याचे नाव त्यांनी आपली मुलगी, "महती" हिच्यावरून ठेवले.

मार्गदर्शक

डॉ. भाग्यलता पाटसकर

डॉ. पाटसकर, (आदर्श संस्कृत शोध संस्था) पुणे, येथील भूतपूर्व संचालक आहेत, या संस्कृत भाषेच्या क्षेत्रातील विदुषी आहेत आणि त्यांनी वेदांच्या प्रसाराकरता खूप मोठे काम केले आहे.
वेद, वेदांत, पुराण यांच्यातला योग्य मजकूर महती इंटरॅक्टिव्हस च्या सर्व निर्मितींमध्ये आणावा आणि तो कसा आणता येईल, याबद्दलचे मार्गदर्शन डॉ. पाटसकर यांनी आम्हाला केले.

सौ.अंजनी वारकर

शिक्षिका म्हणून ३६ वर्ष काम केल्यानंतर, निवृत्तीनंतरही सौ. अंजनी अजूनही वेगवेगळ्या मार्गांनी लहान मुलांशी जोडलेल्या आहेत. त्या स्वतः कथाकथन करतात आणि त्यातील स्पर्धांचे परिक्षणही करतात. त्यांना महानगर पालिकेचा "आदर्श शिक्षिका" पुरस्कार मिळालेला आहे. मातृभाषेतून शिक्षण घेण्याबाबत त्या नेहमीच पालकांना प्रवृत्त करतात. महती इंटरॅक्टिव्हस च्या पुस्तकांमधील भाषा कशी असावी, कोणत्या गोष्टी निवडाव्यात याबाबतीत खूप योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळाले आहे.

कु. वैजयंती ढोले – पाटील

पुण्यात मुद्रण उद्योग स्थापित करून वाढवण्यात वैजयंतीजींचा खूप मोठा सहभाग आहे. महती इंटरॅक्टिव्हस ची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि आम्ही स्वतःच प्रकाशन करावे यासाठी त्यांनी आम्हाला प्रेरित केले. मुद्रण करण्यासाठीचे सर्व मार्गदर्शन त्यांनी केले आहे.

कृतज्ञता

पहिले पाऊल उचलणे सर्वात कठीण आहे, आणि असे बरेच लोक आहेत ज्यांनी संस्थापकांना ते घेण्यास प्रवृत्त केले, आम्ही त्या सर्वांचे विशेष आभार मानू इच्छितो.

डॉ. उमा बोडस
प्रसाद ज्ञानपीठाच्या संस्थापक आणि संचालिका, उमा बोडस यांनी आम्हाला पुस्तक प्रकाशनच्या सर्व बाबी समजून घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

सौ. मीना व श्री. मंगेश काटदरे, गायत्रीचे आईवडील. या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी सर्व मदत, चित्र आणि त्यांची रचना याबाबतीत मार्गदर्शन आणि एकूणच व्यवसायातील इतर बाबींमध्ये त्यांचे सहकार्य आम्हाला मिळत आहे