आमच्या पुस्तकातल्या गोष्टी या शिशूंना लक्षात घेऊन संक्षिप्त
स्वरूपात लिहिलेल्या आहेत. यामध्ये आम्ही जाणीवपूर्वक, नकारात्मक गोष्टींचा उल्लेख
टाळला आहे किंवा गोष्टीची गरज असल्यास नावापुरता केला आहे. पण पालकांना उत्सुकता नक्कीच
असेल की ही मूळ गोष्ट कशी आहे व कुठल्या ग्रंथातली आहे, आणि म्हणूनच आपण या पानावर
आला आहात. इथे आम्ही ही गोष्ट कोणत्या ग्रंथातली आहे, तिचे मूळ संस्कृत रूप आणि त्याचा
अनुवाद दिलेला आहे. पालकांनी ती पूर्ण वाचावी, आपल्या बाळाची समज, त्याला काय सांगायचे
आणि शिकवायचे याबद्दल आपले विचार लक्षात घेऊन घेऊन, गोष्ट वाचून दाखवताना त्यात तपशील
घालावे. पुस्तकातली गोष्ट ही आधार असून, पालकांनी ती आपल्या भाषेत रंगवून आपल्या बाळाला
सांगावी. या पद्धतीने हे पुस्तक खूप वर्ष तुमच्या शिशूंची सोबत करेल.
१. अगदी तान्ह्या बाळांना फक्त रंग कळतील, वस्तू धरायची सवय
होईल.
२. बाळ पालथं पडल्यावर आकर्षक रंग असलेली ही पुस्तके समोर
ठेवल्यास बाळ ती बघत बसेल, घ्यायचा प्रयत्न करेल.
३. या सर्व टप्प्यांवर तुम्ही जर बाळाला गोष्टी वाचून दाखवत
राहिलात तर ते तुमच्या आणि बाळाच्या दिनक्रमाचा एक सुंदर भाग बनू शकेल.
४. हळू हळू मुलं चित्र आणि गोष्टी यांचा संबंध जोडू लागतील.
आणि जसे जसे तुम्ही गोष्ट वाचाल, तशी तशी पानं उलटू लागतील.
५. आणि जेव्हा ही मुलं वाचायला लागतील, तेव्हा अत्यंत सोप्प्या
भाषेतील या गोष्टी त्यांचे पहिले वाचन साहित्य होईल.
Stories
बाप्पाला गणपती का म्हणतात?
बाप्पाला “गणपती” का म्हणतात?
बाप्पाला गणपती का म्हणतात?
बाप्पाला “गणपती” का म्हणतात?
गणपती बाप्पाला दूर्वा का आवडतात?
गणपती बाप्पाला दूर्वा का आवडतात? ही गोष्ट गणेश पुराणातील उपासना खंडातील ६३व्या आणि ६४व्या अध्यायात आहे.
गणपती बाप्पाला दूर्वा का आवडतात?
गणपती बाप्पाला दूर्वा का आवडतात? ही गोष्ट गणेश पुराणातील उपासना खंडातील ६३व्या आणि ६४व्या अध्यायात आहे.